
ग्रामीण
कळमेश्वर :गोरी नाल्याला पूर आल्याने दोन इसम वाहून गेले
कळमेश्वर दिनांक 8 जुलै येथे आज सकाळपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली, दिवसभर पाऊस सुरू असल्यानेे गौरी वरून परमेश्वर या पुलाला अचानक पूूर आला, पुरामुळे दोन व्यक्ती वाहून गेल्याची घटना 4.30 च्या सुमारास घडली
पुरुषोत्तम निंबाळकर (52) आणि प्रवीण शिंदे (40) हे आज साडेचार वाजताच्या दरम्यान आपल्या दुचाकीने पुलावरून कळमेश्वर ला येत असताना अचानक आलेल्या पुराने दोघेही वाहून गेले , घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ रजा शेख आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि दोघांचा शोध सुरू केला
दुसऱ्या मार्गाने गौरी पर्यंत जाऊनही दोन्ही व्यक्तींचा काही थांगपत्ता लागलेला नाही, नगरपालिकेच्या पूर शोधक पथकानेही दोघांचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही यश आले नाही.