
भरपावसात नागपूरात काँग्रेस तर्फे पेट्रोल, डिझेल दरवाढीचा विरोधात सायकल मोर्चा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले नेतृत्व
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा नेतृत्वात आज नागपूरात वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या किंमती च्या विरोधात राज्यव्यापी सायकल मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते । भर पावसात काढण्यात आलेल्या या सायकल मोर्चात राज्याचे पशु व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, आमदार अभिजित वंजारी, विकास ठाकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सायकल घेऊन या मोर्चात सहभागी झाले .
संविधान चौकातून निघालेला हा सायकल मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाला । यावेळी काँग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारला विभागीय आयुक्तांचा मार्फत आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले ।
नागपूरात जोरदार पाऊस आल्याने पावसाची तमा न बाळगता काँग्रेसने आपला मोर्चा जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने देत काढला । पेट्रोल, डिझेल च्या वाढत्या किंमती मुळे महागाई वाढली असून सर्वसामान्यांचे हाल होत असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हंटले आहे ।
आमचा लढा केंद्र सरकारशी असून सरकारने सामान्य माणसाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे अशी मागणीही यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे ।