नागपूर

नागपूर जिल्ह्याकरीता ऑरेंज अलर्ट,भारतीय हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी दिनांक *८ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस व वादळीवाऱ्यासह विज* पडण्याची शक्यता वर्तवली आहे. *दिनांक ९ जुलै रोजी एक किंवा दोन ठिकाणी विज व वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस* पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दिनांक १० जुलै ते १२ जुलै या कालावधी मध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

या अनुषंगाने नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी व नदी नाल्या जवळ राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी.

साधारणत: दुपारी २ ते ७ या वेळेत विज पडण्याचा धोका असल्या कारणानें पाऊस व वादळीवारा सुरू असताना झाडा खाली उभे राहू नये. अशा वातावरणात शेतकऱ्यांनी अतिशय काळजी पूर्वक शेताची कामे करावी व शक्य असल्यास घरीच थांबावे. घरातील दारे खिडक्या तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावी.

नदी किंवा नाल्या वरील पुलावरून पाणी वाहत असल्यास तो ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!