
Breaking News
फडणवीस महाराष्ट्रातच; नव्या घडामोडींमुळं शिक्कामोर्तब
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत देवेंद्र फडणवीसांचं (Devendra Fadnavis) नाव नसल्यामुळं ते तूर्त राज्याच्या राजकारणातच राहणार, हे स्पष्ट झालं आहे
राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याची चर्चा फोल ठरली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळणार असलेल्या संभाव्य नेत्यांच्या यादीत फडणवीस यांचा समावेश नाही. त्यामुळं तूर्त तरी फडणवीस हे महाराष्ट्रातच राहणार असून राज्यातील भाजपचं राजकारण त्यांच्याच भोवती केंद्रित असेल, हे जवळपास स्पष्ट झालं आहे.