
नागपूर
जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी स्थानिक सुटी जाहीर
नागपूर दि. 6 : जिल्हा परिषद व पंचायत समिती रिक्त पदाची पोटनिवडणूक 19 जुलै ला होणार आहे. काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी, मौदा, कामठी, उमरेड, भिवापूर, कुही, नागपूर ग्रामीण, हिंगणा या तालुक्यात पोटनिवडणूक होत आहे.
याठिकाणी मतदारांना मतदान करता यावे म्हणून मतदानाच्या दिवशी संबंधित निवडणूक असलेल्या गटच्या व निवार्चण गण क्षेत्रापुरती स्थानिक सुटी जाहीर करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कळविले आहे.