पूर्व विदर्भ

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी

खरीप हंगाम 2021 साठी 15 जुलैची अंतिम मुदत

गडचिरोली, दि.06 : शासनाने खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला असुन, या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत 15 जुलै आहे. याबाबत संबंधीत कंपनीकडून सुरू करण्यात आलेल्या जनजागृती चित्ररथाला जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी हिरवी झेंडी दाखविली. सदर योजना कर्जदार शेतकऱ्यांना व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा अधिसुचित खरीप हंगामातील पिकांसाठी 2 टक्के, नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये इफ्को टोकिओ जनरल इंन्शुरन्स् कं.लि. 10 वा मजला, सुनित कॅपिटल सोसायटी, सेनापती बापट रस्ता, शिवाजी नगर पुणे-16 असा आहे. तरी विहित मुदतीपुर्वी नजीकच्या बँकेत अथवा आपले सरकार केंद्रावर विमा हप्याल सह आणि आवश्यक कागदपत्रांसह शेतकऱ्यांना जावे असे आवाहन कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे. प्रधान मंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार रथाचे हिरवी झेंडी दाखवताना उपस्थित दीपक सिंगला जिल्हाधिकारी यांचेसमवेत अग्रणी जिल्हा प्रबंधक युवराज टेंभुर्णे, श्री कदम उपविभागीय कृषी अधिकारी, संजय मेश्राम गुण नियंत्रण अधिकारी, कु. शीतल खोबरागडे तंत्र अधिकारी सांख्यिकी, श्री.चलकलवार मंडळ कृषी अधिकारी गडचिरोली हे उपस्थित होते.

*विमा संरक्षित रक्कम, विमा हप्ता व पिकाचे नाव* – 1) भात (तादुंळ)- विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर रुपये 31250/- व शेतकऱ्यांने सहभागी होण्याकरिता भरावयाचा विमा हप्ता प्रती हेक्टर रुपये 625/- इतका आहे. 2) सोयाबिन – विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर रुपये 34500/- असून शेतकऱ्यांने सहभागी होण्याकरिता भरावयाचा विमा हप्ता प्रती हेक्टर रुपये 690/- इतका आहे. 3) कापूस विमा संरक्षित रक्कम प्रती हे. रुपये 35750/-, शेतकऱ्यांने सहभागी होण्याकरिता भरावयाचा विमा हप्ता प्रती हेक्टर रुपये 1787.50/- इतका आहे.

*विमा संरक्षणाच्या बाबी* :- 1) हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पेरणी किंवा लावणी न होणे. 2) पिकांच्या हंगामातील प्रतिकुल परिस्थितीमूळे झालेले नुकसान.

3) पिक पेरणीपासुन काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट. यामध्ये नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्री वादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूसंखलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इ.बाबींचा समावेश आहे.

4) स्थानिक नैसर्गिक आपत्तीमूळे होणारे पिकांचे नुकसान.

5) नैसर्गिक आपत्तीमूळे काढणी पश्चात होणारे पिकांचे नुकसान.

योजनेतील सहभागासाठी तत्काळ नजीकच्या उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकरी तसेच मंडळ कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली यांच्या तर्फे सर्व शेतकरी बंधूना करण्यात आले आहे.

*मागील खरीप हंगामात जिल्हयात 7 कोटींची भरपाई* : विमा कंपनीकडून गडचिरोली जिल्हयात मागील खरीप हंगाम 2020 मध्ये 17900 पीक वीमा धारक शेतकऱ्यांना झालेल्या नुकासानापोटी 7.22 कोटी रूपये मंजूर झाले. त्यातील 5.43 कोटी वाटप करण्यात आले असून उर्वरीत वाटप सुरू आहे. गेल्यावर्षी जिल्हयातील 37184 शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता. पीक विम्यापोटी 1.983 कोटी रूपये शेतकऱ्यांकडून भरण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!