
आरोपींचा शोध सुरू, जरीपटका स्थित अवनी ज्वेलर्स दरोडा प्रकरण
नागपुरात दुपारी सोन्या चांदीच्या दुकानात बंदुकीच्या धाकावर दुकानदाराला ओलीस धरुन दरोडा टाकण्यात आला. चार आरोपींनी हा दरोडा टाकला असून दुकानदाराला बांधून मारहाण करण्यात आली. पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत त्यासाठी जवळपासचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे
पोलिसांच्या प्राथमिक तपासात दोन बाईक वरुन चार आरोपी आले होते आणि ते हिंदी बोलत होते त्याचप्रमाणे एक जण शनिवारी एका महिलेसह दुकानात खरेदी करायला आला होता तो आरोपीतील एक असावा असा संशय दुकानदाराने व्यक्त केला. यावरुन ही लुटारुंची टोळी असावी असा अंतज सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे.
घटना कशी घडली
5 जुलै वेळ दुपारी 2 वाजताच्या दरम्यानची होती. दरोडेखोरांपैकी एक जण ग्राहक बनून दुकानात आला. थोड्या वेळात दुसऱ्याने दुकानात प्रवेश करत दुकांदारावर बंदूक ताणली आणि तिसऱ्याने दुकानात प्रवेश करत शटर बंद केलं. दुकानदाराचे हात पाय बांधून त्याला मारहाण केली. तर इतरांनी दुकानात असलेली चार लाख रुपये कॅश आणि सोन्या चांदीचे दागिने लुटले.
एक जण बाहेर पाळत ठेऊन होता. दुकानदार दुकानात एकटाच असल्याने आणि त्यांनी आधीच त्याला बंधक बनविल्याने तो काहीही करु शकला नाही. भर वस्तीतील अगदी रस्त्यावर असलेलं दुकान दरोडेखोर लुटत होते मात्र बाहेरून जाणाऱ्या येणाऱ्यांना त्याची भनक सुद्धा लागली नाही.