नागपूर

गणेशउत्सवाच्या संदर्भात भारतीय जनता युवा मोर्चा 11 जुलै ला मनपा आयुक्तांना देणार निवेदन !

नागपूर दिनांक 10 जुलै (महानगर प्रतिनिधी )

गणपती हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपुर्ण देशाचे आराध्य दैवत आहे. यंदा २०२२ चा गणेश उत्सव हा ३१/०८/२०२२ ते ०९/०९/२०२२ दरम्यान रहाणार आहे. अश्या वेळी मागील दोन वर्षांपासुन हा उत्सव कोविडमुळे नागरिक साजरा करू शकले नसल्यामुळे सर्वांच्या मनात उत्साह आणि आनंद असतांना प्रशासनाने गणपतीची मुर्ती ही केवळ ४ फुटाची असावी असा नुकताच आदेश काढला आहे.

याचा दोन समुहांमध्ये परिणाम पडत आहे,पहिला म्हणजे मुर्तीकार ज्यांनी तीन ते सहा महिन्यांपुर्वीच आपल्या कामाची सुरूवात केली होती. ज्यांच्यासाठी हा निर्णय हा आर्थिक प्रमाणावर नुकसान करणारा आहे आणि दुसरा परिणाम हा सामान्य माणसाच्या उत्साहावर होईल.

गणपती उत्सवाच्या निमित्याने लोक मोठ्या प्रमाणावर एकत्रित होतात व हा उत्सव साजरा करतात. या निर्णयामुळे त्यांच्या देखील उत्सहावर आघात पडणार आहे. त्यामुळे सामान्य जनतेची भावना व मुर्तीकारांचे आर्थिक नुकसान होणार नाही याची प्रमुख खबरदारी घेण्याकरीता भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातुन मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे.

निवेदनाला प्रामुख्याने चंद्रशेखर बावनकुळे ,माजी उर्जा व पालकमंत्री नागपुर जिल्हा व प्रदेश महामंत्री भाजपा महाराष्ट्र, आ. प्रविण दटके, आमदार व शहर अध्यक्ष भाजपा, नागपुर महानगर, संदिप जोशी, माजी महापौर, मनपा नागपुर, शिवानी दाणी वखरे, प्रदेश महामंत्री, भाजयुमो महाराष्ट्र, पारेंद्र पटले, शहर अध्यक्ष, भाजयुमो नागपुर महानगर उपस्थित रहाणार आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!