नागपूर

मनपा केन्द्रांमध्ये सोमवारी कोव्हीशिल्डचे लसीकरण नाही

नागपूर, ता. ४: शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला कोव्हीशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या कोविशीइल्ड लसीकरण केन्द्रांवर सोमवारी (५ जुलै) रोजी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही, ही माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

१८ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लस चा पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशिनगर झोन च्या मागे (डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!