पश्चिम विदर्भ

वाशिम जिल्ह्यातील ४ जुलै रोजीचे लसीकरण विषयी माहिती

वाशिम जिल्ह्यातील सर्व जनतेस आव्हान करण्यात येत आहे की, उद्या, ४ जुलै २०२१ रोजी जिल्ह्यातील सर्व प्रा.आ.केंद्र, ग्रामीण रुग्णालय, वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय इतर लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना #कोव्हॅक्सिन आणि #कोव्हीशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध आहे. वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दोन्ही लसींचे केवळ दुसरे डोस उपलब्ध असतील.

१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींनी सर्व लसीकरण केंद्रावर #ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून अपॉईंटमेंट बुक करावी. यासाठी आज, ३ जुलै रोजी रात्री ठीक ९ वाजता उपरोक्त सर्व केंद्रावरील नोंदणी प्रक्रिया सुरु होईल. लसीकरण घेण्यास ऑनलाईन पद्धतीने अपॉईंटमेंट बुक करूनच लसीकरण केंद्रावर जावे. जेणेकरून लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही व कोविड -१९ नियमांचे उल्लंघन होणार नाही.

#ऑफलाईन पद्धतीने फक्त ४५ वर्षावरील व्यक्ती, अपंग व्यक्ती, बेघर व्यक्ती तसेच दुसऱ्या डोससाठी पात्र व्यक्ती यांनाच प्राधान्य राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!