नागपूर

नागपूर मनपा केन्द्रांमध्ये शुक्रवारी कोव्हीशिल्डचे लसीकरण नाही

नागपूर, ता. १ : शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला कोव्हीशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या सर्व लसीकरण केन्द्रांवर शुक्रवारी (२ जुलै) रोजी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही, ही माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशिनगर झोन च्या मागे (डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे. तसेच ज्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!