महाराष्ट्र

महाराष्ट्रात पुढचे 4 दिवस मुसळधार पाऊस,या जिल्ह्यांना अलर्ट जारी

महाराष्ट्र दि 29 जून : राज्यात मान्सून चे आगमन जोरात झाले होते,मात्र त्यानंतर काही दिवस पावसाने दडी मारली,पावसाची चिन्ह दिसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला होता,आता दडी मारलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होणार आहे

राज्यात पुढच्या 4 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (Weather Alert) देण्यात आली आहे. काल सोमवारीही राज्यात अनेक जिल्हात पावसाने हजेरी लावली आहे

पुढच्या दोन दिवसांमध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि घाट परिसरात मुसळधार पाऊस होईल. इतकंच नाहीतर मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई वगळता पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये एखाद-दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा राज्यात पाऊस ब्रेक घेण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार मुंबईसह पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग येथे मंगळवारपर्यंत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम सरींचीच शक्यता आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर येथे शनिवारी, तर अमरावती, अकोल्यामध्ये रविवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!