
गौरवास्पद! अमरावतीचा पोलीस शिपाई विदेशात देणार सेवा
भारतातील आयएएस, आयएफएस’ दर्जाच्या अनेक अधिकाऱ्यांना सेवा देण्यासाठी विदेशात पाठवले जाते,महाराष्ट्र पोलीस दलात सेवा देणारे अनेक अधिकारी विदेशात जाऊन सेवा देत आहेत यावेळी पोलीस शिपायाला थेट विदेश सेवेत पाठवण्यात आल्याची घटना घडली आहे
शिपायाला विदेशात जाऊन सेवा देण्याची विरळ घटना अमरावतीच्या पोलीस शिपायाला मिळाली आहे, अमरावती ग्रामीण पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असणाऱ्या विकास अंजिकर असेे याा पोलिस शिपायाचे नाव आहे
धिकार्यांप्रमाणेच पोलीस दलातील प्रामाणिक व कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांना विदेशात सेवा देण्यासाठी पाठविण्यात येते. याच योजनेअंतर्गत विकास अंजीकर यांना तीन वर्षांसाठी ‘फॉरेन डेप्युटेशन’वर पाठविण्यात आले आहे, अंजीकर पुढील तीन वर्ष विदेशात जाऊन ‘सिक्युरिटी असिस्टंट’ म्हणून सेवा देणार आहेत.
देशात जाऊन भारतमातेची प्रामाणिकपणे सेवा बजावण्याची संधी मला मिळाली ही खूप मोलाची गोष्ट आहे. याचे श्रेय ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन व माझे आई-वडील, पत्नी व कुटुंबीयांना आहे,’ अशी भावना अंजिकर यांनी व्यक्त केली