
पावसाळी अधिवेशन: लस घेतल्यानंतरही आमदाराना कोरोना चाचणी बंधनकारक
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्याचे संकेत मिळत असतानाच डेल्टा प्लस या नवीन कोरोना विषाणूने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे
महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी विधान भवन प्रवेशाकरीता कोविड-19 संदर्भात RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.
मुंबईतील विधान भवनात उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत RT-PCR चाचणी संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. (RT PCR test is compulsory for all MLA amid state assembly session)
लस घेतलेल्यांनाही चाचणी करावी लागणार
दोन्हीही सभागृहांचे सदस्य, त्यांच्या वाहनांचे चालक आणि वाहनातून मुंबईत येणारे सहप्रवासी अशा सर्वांनी सोयीच्या ठिकाणी मान्यताप्राप्त लॅबमध्ये दिनांक 3 किंवा 4 जुलै या निर्धारित वैध कालावधीसाठीची RT-PCR चाचणी करून त्याचा अहवाल विधान भवन प्रवेशासाठी सोबत ठेवणे आवश्यक असेल. लसीकरणातील पहिला वा दुसरा डोस घेतलेल्यांना तसेच कोविड-19 संदर्भातील प्रतिपिंड (Antibodies) चाचणीचा सकारात्मक अहवाल असणाऱ्यांनासुध्दा RT-PCR चाचणी करणे अनिवार्य राहील.