
काय आहे डेल्टा प्लस व्हायरस,लक्षणे आणि उपाय
कोविडच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरियंटने भारतात हातपाय पसरायला सुरुवात केलीय. हा नवीन डेल्टा प्लस व्हायरस झपाट्याने पसरत आहे. नवीन डेल्टा प्लसची बऱ्याच केसेस महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब आणि मध्य प्रदेशात आढळल्या आहेत.
जाणून घ्या काय आहे डेल्टा प्लस,लक्षणे आणि उपाय
कोरोनाचा नवीन डेल्टा प्लस प्रकार काय आहे?
कोरोनाचा नवीन डेल्टा प्रकार म्हणजेच B.1.617.2 प्रथम भारतात आढळला. कोरोना विषाणूच्या स्वरूपात बदलांमुळे, डेल्टा प्लस प्रकार तयार झाला आहे. हा विषाणू प्रथम युरोपमध्ये आढळला होता. स्पाइक प्रोटीन हा कोरोना विषाणूचा मुख्य भाग आहे. ज्याच्या मदतीने हा विषाणू मनुष्याच्या शरीरात प्रवेश करून संसर्ग पसरवतो.
कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकारची लक्षणे
कोरानाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटची सामान्य लक्षणे म्हणजे ताप, कोरडा खोकला आणि थकवा,घसा खवखवणे, चव आणि गंध कमी होणे, डोकेदुखी आणि अतिसार यांचा समावेश आहे.
कोरानाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटच्या तीव्र लक्षणांमध्ये छातीत दुखणे, धाप लागणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे, अशा लक्षणांचा समावेश आहे.
कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट टाळण्याचे उपाय
घराबाहेर पडताना दुहेरी मास्क घाला.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, लोकांपासून 6 फूट अंतर ठेवा.
घरातल्या आणि आसपासच्या वस्तू स्वच्छ ठेवा आणि निर्जंतुकीकरण ठेवा.
20 सेकंद तरी साबणाने आपले हात स्वच्छ धुवा.