
अनिल देशमुख यांना इडी समोर हजर राहण्याचे निर्देश,दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक
पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या असून अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने देशमुख (Anil Deshmukh) यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे (Kundan Shinde) आणि संजीव पालांडे (Sanjeev Palande) यांना बेड्या ठोकल्या.
अनिल देशमुख यांना ईडीसमोर उपस्थित राहण्याचे निर्देश ईडी कार्यालयाने बजावले आहे
त्यापूर्वी मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्या (PMLA) अंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी दोघांना सकाळी 11 वाजताच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात येणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अनिल देशमुख यांच्या नागपूर निवासस्थानी ईडीने काल (शुक्रवार) सकाळपासूनच छापेमारी सुरु केली होती. तब्बल 8 ते 9 तास ही छापेमारी चालली होती. नागपुरातील निवासस्थानी देशमुख कुटुंबियांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर संध्याकाळ ईडीचे अधिकारी काही कागदपत्रांसह घराबाहेर पडले. तर देशमुख यांच्या दोन्ही खासगी स्वीय सहाय्यकांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा ईडीने दोघांनाही अटक केली.