
विकास ठाकरे आणि ज्वाला धोटे यांच्या हस्ते फेसशील्ड प्रदान
नागपूर दि 26 जून: आमदार विकास ठाकरे आणि ज्वाला धोटे यांच्या हस्ते NIT चे अधिकारी व स्टाफ करिता कोरोणा संसर्गापासून बचाव हेतू 200 Face Shields प्रदान करण्यात आले .
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूरात कोरोनाने थैमान घातले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या व रा का पा अर्बन सेल च्या अध्यक्षा ज्वाला जांबुवंतराव धोटेेेे यांनी गरजू लोकांना मास्क, सॅनिटायझर आणि फेस शिल्ड चे वाटप करण्याचा उपक्रम सुरू केला ,या उपक्रमात रेड लाइट एरिया, स्लम एरिया,पोलीस स्टेशन अश्या विविध ठिकाणी त्यांनी मास्क आणि सॅनिटायझर चेे वाटप केले
या उपक्रमांतर्गत NIT चे अधिकारी व स्टाफ यांंचा कोरोणा संसर्गापासून बचाव हेतू 200 फेस शिल्ड आदित्य हीरो तर्फे आ.विकास ठाकरे आणि ज्वाला धोटे यांनी प्रदान केले तसेच विकास ठाकरे तथा ज्वाला धोटे यांनी NIT तर्फे होणार असलेल्या नवीन विकास कार्यासंदर्भातील माहिती घेतली
या प्रसंगी NIT Chairman मनोज कुमार सूर्यवंशी,आदित्य हीरो समूहाचे सर्वेसर्वा डाॅ.प्रकाश जैन तथा वृषभ विकास ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.