
सोयाबीनला आजपर्यंतचा उच्चांकी दर, शेतकरी सुखावला
वाशीम दि 25 जून : मागील काही वर्षात सोयाबीनला पाहिजे तसा दर मिळत नव्हता या वर्षी मात्र कधी नव्हे एवढा भाव मिळाला आहे आणि सोयाबीनच्या भावाने नवीन रेकॉर्ड बनवला आहे
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील तीन चार दिवसांत सोयाबीनला 9 हजार 500 रुपये दर मिळत असल्याने शेतकरी सुखावला आहे
पश्चिम विदर्भातील सोयाबीनची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन दिवसापासून चांगले दर मिळत आहेत. शासकीय आधारभूत किंमत 3 हजार 880 रुपये असताना प्रत्यक्षात मात्र दर नऊ हजार पार गेले आहेत. त्यामुळं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.
सोयाबीनचा हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरु होतो. मात्र त्यावेळी सोयाबीनला 3 हजार 500 ते 4 हजार पर्यंत दर होता. आता सोयाबीनला इतिहासात पहिल्यादांचं 9 हजार पार दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे. मात्र हे दर 2021 चा हंगामात ही कायम राहावे अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.