
ओबीसी आरक्षण रद्द होण्यास भाजपाच जबाबदार : नाना पटोले
भाजपच्या चोराच्या उलट्या बोंबा, आरक्षण रद्द होण्यास तेच जबाबदार अशी घणघनाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी करत “ओबीसी आरक्षण प्रश्न हा केवळ राज्याचा नव्हे तर देशाचा आहे. संपूर्ण देशातील ओबीसी वर्गाचे नुकसान झाले आहे असा मोठा आरोप पटोले यांनी भाजपा वर केला आहे
तसेच या प्रश्नावर राज्यसरकारने न्यायलयात धाव घेतली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. (Nana Patole on OBC reservation and ZP election)
2017 मध्ये हा विषय आल्यावर हेच राज्यातील ओरडणारे विरोधी पक्षातील लोक सत्तेत होते, त्यावेळी त्यांनी लक्ष दिले नाही. केंद्र सरकार ओबीसीची आकडेवारी देत नाही. त्यामुळे न्यायालयाने राज्यातील राजकीय आरक्षण रद्द केले आहे. मात्र आता हा केवळ राज्याचा नव्हे तर देशाचा प्रश्न आहे, असे नाना पटोले म्हणाले.
तसेच आता या आरक्षणासाठी राज्य सरकार न्यायालयात गेले आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही लवकरच चर्चा करणार आहोत, अशी माहितीही नाना पटोले यांनी दिली.