पूर्व विदर्भ

भंडाऱ्यात कोविड लसीकरण मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद

दोन दिवसात 16553 नागरिकांचे लसीकरण

भंडारा दि.22:- लसीकरणात ज्या गावांचा प्रतिसाद कमी होता अशा ठिकाणी सोमवार व मंगळवारला विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेला जिल्हाभरात उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला असून दोन दिवसाच्या मोहिमेत 16 हजार 553 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे सर्व यंत्रणांनी यासाठी जिल्हाभर जनजागृती अभियान राबविले होते. याचाच परिपाक म्हणून जिल्ह्यात दोन दिवसात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले.

45 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरणाची विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आढावा बैठकीत दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने 21 व 22 जून रोजी जिल्ह्यातील 244 गावांत विशेष लसीकरण अभियान राबविले. या अभियानाला पात्र लाभार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. भंडारा-53, मोहाडी-26, साकोली-48, लाखनी-25, पवनी-39, लाखांदूर-34 व तुमसर-19 अशा 244 गावांचा लसीकरणावर या मोहिमेत लक्ष केंद्रीत करण्यात आले होते.

21 जून रोजी 8318 नागरिकांनी लस घेतली यात 7616 नागरिकांनी पहिला तर 702 नागरिकांनी दुसरा डोस घेतला. आज 22 जून रोजी 18 ते 44 वयोगटातील 2649 तर 45 वर्षावरील 5586 अशा एकूण 8235 नागरिकांनी लस घेतली. यात 7572 नागरीकांनी पहिला डोस तर 663 नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला. यासोबतच आज 18 वर्षावरील तरुण तरुणींसाठी 13 केंद्रावर लसीकरण करण्यात आले. याला सुध्दा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. उद्यापासून 18 वर्षावरील नागरिकांनी जिल्हाभरात 167 केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. यात ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश असणार आहे. लाभार्थ्यांनी गर्दी न करता व कोविड नियमांचे पालन करून लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके व समन्वयक डॉ. माधुरी माथूरकर यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!