पूर्व विदर्भ

रस्ते व पुल बांधकामामुळे वर्धा जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल – केंद्रीय मंत्री नितिन गडकरी   

नांदगांव चौरस्तावरील उड़ान पुलाचे लोकार्पण व शेडगाव चौरास्तावरील पुलाचे भूमिपूजन.

वर्धा जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात कोटयावधी रकमेची रस्ता व पुल बांधकामे झाली आहेत. यामुळे वर्धा जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विकास मंत्री नितिन गडकरी यांनी केले.

नागपुर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ७ वरील हिंगणघाट येथील नांदगांव चौरास्ता वरील ८५.२८ कोटी रकमेच्या उड्डाण पुलाचे लोकार्पण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. तत्पूर्वी गडकरी यांचे हस्ते महामार्गावरील शेडगाव चौरास्ता येथे ४७.७८ कोटी रकमेच्या प्रस्तावित उड़ानपुलाचे भूमिपूजन केले. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिवाजी मार्केट यार्डचे आवारात आयोजीत कार्यक्रमाला व्यासपीठावर खासदार रामदास तड़स , खासदार डॉ विकास महात्मे , ज़िल्ह्या परिषद अध्यक्ष सरिता गाखरे,आमदार समीर कुणावार, आमदार पंकज भोयर, आमदार दादाराव केचे, आमदार रामदास आंबटकर, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रातार ,नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अँड सुधीर कोठारी, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ शिरीष गोडे यांची उपस्थितीत होती.

पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, वर्धा ज़िल्ह्याचे विकासाकरिता कोटयावधीचा निधी केंद्र शासनाकडून कडून देण्यात आला. यात शहरी भागासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रस्ता व पुलांची बांधकामे झाली. यामुळे वर्धा ज़िल्ह्याचे विकासाला गती मिळाली आहे. तसेच ग्रामीण भागातील जनतेला , शेतकरी वर्गाला सोई सुविधा प्राप्त झाल्याने शेती विकासाला सुद्धा गती प्राप्त झाली आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीमुळे दुरचा प्रवास सुकर झाला आहे.

वर्धा जिल्ह्यात अनेक कामाना मंजुरी देण्यात आली असुन सदर कामे निविदा स्तरावर आहे. या सर्व कामाचा पढ़ा ना गड़करी यांनी आपल्या भाषणातून वाचून दाखविला . हिंगणघाट कृषी बाजार समितीच्या कार्याची प्रशंसा करुन बाजार समितीने सहकार्य केल्यास शेतकऱ्यांना शेतमाल ठेवन्याकरिता शीत गृहाचे बांधकाम करण्याकरीता सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन ना गडकरी यांनी सभापती सुधीर कोठारी यांना दिले . तसेच हिंगणघाट बाजार समितीने योगदान दिल्यास हिंगणघाट येथे अद्यावत रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालय उभारणे शक्य आहे असे सांगून याकरिता सुद्धा सर्वपरी सहकार्य देण्याचे आश्वासन सुद्धा ना गडकरी यांनी दिले.वना नदीच्या खोलिकण करणे गरजेचे असल्याचे आ कुणावार यांनी आपल्या भाषणातून सांगितले . यावर बोलताना ना गडकरी यांनी वना नदीच्या खोलिकरणाचे काम लवकरच सुरु करणार असल्याचे सांगून तशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी वर्धा व सबंधित अधिकाऱ्याना दिल्या. वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णावर उपचार करन्याकरिता मोठ्या प्रमाणात रेमडीसिवर औषधीची निर्मिती होत असल्याने जगात वर्धा ज़िल्याचे नाव पोहचले असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच जिल्ह्यात मोठ्या संख्येने ऑक्सीजन प्लांट ची निर्मिती होत असल्याने कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सीजनची कमतरता भासनार नाही याची त्यांनी ग्वाही दिली. तसेच सरतेशेवटी कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

खासदार रामदास तड़स व आमदार समीर कुणावार यांची भाषणे झाली . प्रास्ताविक नगराध्यक्ष प्रेम बसंतानी तर संचालन रेणूका देशकर यांनी केले. उपस्तितांचे आभार नीलेश येवतकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!