Breaking News

वर्धेत शासकीय, खाजगी कार्यालये 100 टक्के उपस्थितीस परवानगी 

#निर्बंधामधील_शिथिलता_पूर्वीप्रमाणे_कायम.

कृषिशी संबंधित बाबी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा.

वर्धा जिल्हयातील या आठवड्यातील कोविड सकारात्मक अहवाल असलेल्या रुग्णांची टक्केवारी 2.05 टक्के असुन व्यापलेल्या ऑक्सिजन बेडची टक्केवारी 1.57 टक्के असल्याने वर्धा जिल्हा टप्पा एक (1) मध्ये आहे. तथापी, सधस्थितीत जिल्हयातील आय.सी.यु.बेड व व्हेंटीलेटर बेड कोरोना रुग्णांनी व्यापलेले असुन आय.सी.यु.बेड व व्हेंटीलेटर बेड उपलब्धता कमी असल्याने वर्धा जिल्हयात कोविड-19 संसर्ग वाढु नये तसेच जिल्हयातील आरोग्याची स्थिती नियंत्रणात राहावी म्हणून 5 जून रोजी जारी केलेल्या आदेशानुसार सर्व सेवा सुरू ठेवण्याबाबत जिल्हा आपत्ती निवारण समितीने एकमताने निर्णय घेतला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी 14 जून पासून पासुन पुढील आदेशापर्यंत अंशत: सुधारणेसह पूर्वीचे निर्बंध कायम राहतील असे आदेश जारी केले आहेत.

5 जून रोजी निर्बंधामध्ये दिलेली शिथिलता पूर्वीप्रमाणेच कायम राहील.

तर 5 जून रोजीच्या आदेशात अंशतः केलेली सुधारणा अशी आहे.

जिल्ह्यात जमावबंदी लागु राहील. तसेच शासकीय/निमशासकीय/खाजगी – आस्थापना व कार्यालयातील उपस्थिती 100 टक्के क्षमतेने सुरु राहतील तर कृषी संबंधीत बाबी दररोज सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!