पूर्व विदर्भ

वर्धा जिल्ह्याला 41000 लसी प्राप्त, लसच आपल्याला तिसऱ्या लाटेपासून वाचवेल:पालकमंत्री

#कोरोना_नियमांचे_पालन_करूनच_नागरिकांनी_व्यवहार_सुरू_ठेवावेत

*- पालकमंत्री सुनील केदार*

*कोविड परिस्थितीचा घेतला आढावा*

*नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे*

*लसच आपल्याला तिसऱ्या लाटेपासून वाचवेल*.

आपला जिल्हा शासनाने ठरवून दिलेल्या निकषातील तिसऱ्या टप्प्यात येत असल्यामुळे जिल्ह्यात सर्वच बाबतीत शिथिलता देण्यात आली असली तरी नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून व्यवसाय आणि व्यवहार करणे आवश्यक आहे. अति उत्साहामुळे आपल्या कुटुंबाला आणि जिल्ह्याला आपण पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत घेऊन जाणार नाही याची काळजी प्रत्त्येक नागरिकाने घ्यावी असे आवाहन करून प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी अशा सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संसर्ग परिस्थितीचा आढावा घेताना  केदार बोलत होते. यावेळी आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले, सेवाग्राम आयुर्विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ नितीम गंगणे, सावंगी रुग्णालयाचे डॉ अभ्युदय मेघे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, मुख्याधिकारी विपीन पालिवाल उपस्थित होते.

कोविड चाचणी करण्यात जिल्हा सहाव्या स्थानावर असल्याबाबत समाधान व्यक्त करतानाच केदार यांनी जिल्ह्यात टेस्टिंग वाढविण्याच्या सूचना केल्यात. तसेच कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना चाचण्या वाढवल्या पाहिजेत असेही ते म्हणाले.

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला मधल्या काळात चांगला वेग मिळाला होता. त्यामुळे जिल्ह्यात 45 ते 60 व त्यापुढील वयोगटातील लोकांचे 40 टक्के लसीकरण झाले याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र लसीच्या तुटवडयामुळे तो वेग कमी झाला. आता पुन्हा जिल्ह्याला 41 हजार लसी प्राप्त असून ग्रामीण भागात जनतेला लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. जुलै महिन्याच्या अखेरीस आपल्या जिल्ह्यातील 50 टक्केपेक्षा जास्त लसीकरण व्हायला पाहिजे. लसीकरणच आपल्याला तिसऱ्या लाट पासून वाचवू शकेल. लस घेतल्यामुळे शरीरात कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी शरीरात प्रतिपिंडे तयार होतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही किंवा झाला तरी त्याची लक्षणे अगदी सौम्य असतात. यामुळे लोकांचे प्राण, वेळ आणि पैसा दोन्हीची पुढील काळात बचत होईल. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकानी त्यांचा पहिला आणि दुसरा डोज पूर्ण करावा असे आवाहन यावेळी केदार यांनी केले.आरोग्य विभागाने याबाबत जनजागृती करावी अशा सूचना त्यांनी दिल्यात.

शासनाने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका खरेदी करून जिल्ह्याला पाठविल्या आहेत. आपल्या जिल्ह्याला 11 रुग्णवाहिका मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना यामुळे लवकर रुगणालायात पोहचविणे सोपे होईल.

म्युकर मायकोसिस आजाराचे जिल्ह्यात आतापर्यंत 93 रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाला तर 21 रुग्ण बरे झाले आहेत. उर्वरित 68 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोविड मधून बऱ्या झालेल्या रुग्णांनी या आजाराबाबत दक्ष असावे. काहीही लक्षणे वाटल्यास तात्काळ डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत. त्यासाठीचे औषधी आपल्याकडे पुरेशा प्रमाणात आहेत असेही  केदार यावेळी म्हणाले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कोविड संदर्भात माहिती देताना जिल्ह्याचा आज संपलेल्या आठवड्याचा पॉझिटिव्हीटी दर 4.59 टक्के असल्याचे सांगितले. तसेच मृत्युदर 1. 89 असून रुग्ण दुप्पट होण्याचा वेग हा 200 दिवस असल्याची माहिती दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!