
आम आदमी पार्टीची मनपा निवडणूक समिती घोषित
चार दिवसांपूर्वी आप राज्य सिमिती कडून देवेंद्र वानखड़े व जगजीत सिंग यांना प्रभारी व सहप्रभारी घोषित करण्यात आले होते. यानंतर लगेच देवेंद्र वानखड़े व जगजीत सिंग मागील तीन दिवसात सहाही विधानसभा समितिसोबत आढावा बैठकी आयोजित केल्या होत्या.
सर्व विधानसभा समितिचा आढावा घेतल्यानंतर मनपा निवडणुकीची पुढील रणनीती तयार करण्यासाठी आणि २०२२ च्या सुरवातीला होणाऱ्या निवडणुका मज़बूतीने लढवून यश संपादित करण्याच्या हेतूने विधानसभा निहाय काही पदाधिकाऱ्यांची विधानसभा निहाय निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त केली आहे.
दक्षिण-पश्चिम नाग. विधानसभा – अशोक मिश्रा (राज्य सह सचिव) आणि प्रशांत निलटकर (शहर सह संयोजक),
दक्षिण नाग. विधानसभा – अम्बरीष सावरकर (राष्ट्रीय परिषद सदस्य) व डॉ शाहीदअली जाफरी (शहर सह संयोजक व राज्य हेल्थ विंग सदस्य),
पश्चिम नाग. विधानसभा – कविता सिंगल (महानगर संयोजक) व अड़ राजेश भोयर (राज्य grc सदस्य)
मध्य नाग. विधनसभा – नीलेश गोयल (महानगर संगठन मंत्री)व कृतल आखरे (राज्य युवा समिती सदस्य),
पूर्व नाग. विधानसभा – भूषण ढाकुलकर (महानगर सचिव विधर्भ मीडिया प्रमुख राज्य मीडिया संघ),
उत्तर नाग. विधानसभा – शंकर इंगोले (महानगर संगठन मंत्री) व जितेंद्र मुरकुटे (विदर्भ सह सचिव),