पश्चिम विदर्भ

यवतमाळात 4 कोटींचे अवैध बियाणे जब्त,शेतकऱ्यांची फसवणूक थांबवली

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील सीड प्रोसेसिंग प्लांटमध्ये कृषी विभागाने छापा टाकून 4 कोटींचे अवैध बियाणे जब्त केले,एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध बियाणांचा साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे

सविस्तर माहिती अशी की दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथील धरतीधन सीड प्रोसेसिंग प्लांटमध्ये  पुणे, यवतमाळ व दारव्हा येथील कृषी विभागाच्या पथकाने धरतीधन सीड प्रोसेसिंग प्लांटमध्ये छापा टाकला. यामध्ये अवैधरित्या बियाणे तयार केले जात असल्याचं उघडकीस आलं आहे.

कृषी विभागाने संजय मोहनलाल मालानी (५४) रा. बोरीअरब याच्यावर कारवाई करून गोदाम सील केले आहे.

संजय हा  बाजारातून सोयाबीन, तूर, चणा आणायचा आणि मशीनमधून छाटणी करून बॅग भरायची आणि तयार झालेली ३० किलोची बॅग शेतकऱ्यांच्या माथी मारायची, असा प्रकार या गुन्हेगारांकडून केला जातो. कमी दरात बियाणे मिळत असल्याच्या आशेपोटी शेतकरी हे बियाणे खरेदी करत होते आणि त्यांची फसवणूक होत होती

या बीज प्रक्रिया केंद्रावरून ८५० क्विंटल सोयाबीन व तूर बियाणे, ६६०.५ क्विंटल लूज सोयाबीन, एक हजार ७७९ क्विंटल लूज तूर, दोन हजार ७०० क्विंटल लूज चणा आणि ट्रकमधून २५० क्विंटल सोयाबीन जप्त करण्यात आले.

या सर्व मालाची किंमत ४ कोटी २० लाख रूपये असल्याचे तपास पथकाकडून सांगण्यात आले.

आरोपी संजय मोहनलाल मालाणी यांच्यावर भादंवि ४२०, ४६३, ४६५, ४६८, ४७१ कलमान्वये तसेच सहकलम ७ ए, ७ बी, ७ सी, ७ डी बीज अधिनियम कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!