पश्चिम विदर्भ

वाशीम येथील महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार करून मारहाण,पोलीस निरिक्षकावर आरोप

ओळखीचा गैरफायदा घेत नांदेडच्या पोलीस निरीक्षकाने वाशीम येथे येऊन महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी बलात्कार करून मारहाण केली असा आरोप महिला पोलीस कर्मचाऱ्याने केला आहे,पोलीस निरिक्षकावर बलात्काराचा आरोप झाल्याने पोलीस दलासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे

स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी यांच्यावर बलात्कार करून मारहाण केल्या प्रकरणी वाशिम शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी विश्वकांत गुट्टे नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक असून, त्यांच्यावर 376 सह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून,पुढील तपास वाशिम शहर पोलीस करीत आहेत.

वाशिमच्या मालेगाव पोलीस ठाण्यात 2007 मध्ये विश्वकांत गुट्टे पीएसआय या पदावर कार्यरत असतांना सदर महिला पोलीस कर्मचाऱ्यांची ओळख झाली होती.त्याच ओळखीचा फायदा घेत दोन दिवसांपूर्वी वाशिममध्ये आरोपी घरी आला असता त्यांनी जबरदस्ती करीत बलात्कार केला आहे.त्याप्रकरणी काल रात्री महिला पोलीस कर्मचारी यांनी वाशिम शहर पोलिसांत 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अल्का गायकवाड करीत असल्याचे पोलीस निरीक्षक ध्रुवास बावनकर यांनी सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!