महाराष्ट्र

नवनियुक्त मंत्र्यांच्या बंगल्यांचं वाटप जाहीर,कोणाला भेटला कोणता बंगला…

महाराष्ट्र दिनांक 23 ऑगस्ट (प्रतिनिधी)

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडलाय, खातेवाटपही झालंय. खातेवाटपाच्या १० दिवसांनंतर नवनियुक्त मंत्र्यांच्या बंगल्यांचं वाटप जाहीर झालं आहे. त्यानुसार चंद्रकांत पाटलांना लोहगड, गिरीश महाजनांना सेवासदन तर रविंद्र चव्हाणांना रायगड बंगला मिळाला आहे.

अनेक बंगल्यांसाठी मंत्र्यांची रस्सीखेच पाहायला मिळत होती. त्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे अनेकांनी आर्जवही केलं. सेवासदन बंगल्यासाठी गिरीश महाजन आग्रही होते. कारण सागर बंगल्याला लागूनच सेवा सदन बंगला आहे. तो बंगला मिळावा, यासाठी महाजनांनी विशेष प्रयत्न केले. अखेर त्यांना सेवासदन बंगला मिळाला आहे.

कुणाला कुठला बंगला?

चंद्रकांत पाटील-सिंहगड

गिरीश महाजन-सेवासदन

रविंद्र चव्हाण-रायगड

अतुल सावे-शिवगड

मंगलप्रभात लोढा-विजयदुर्ग

गुलाबराव पाटील-जेतवन

शंभुराद देसाई-पावनड

संजय राठोड-शिवनेरी

सुधीर मुनगंटीवार-पर्णकुटी

विखे पाटील-रॉयलस्टोन

दीपक केसरकर-रामटेक

विजयकुमार गावित- चित्रकुट

राहुल नार्वेकर- शिवगिरी

सुरेश खाडे-ज्ञानेश्वरी

उदय सामंत- मुक्तागिरी

अब्दुल सत्तार-पन्हाळगड

दोन आठवड्यांपूर्वी खातेवाटप जाहीर

राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास

गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे-बंदरे व खनिकर्म

संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे-कामगार

संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत- उद्योग

प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र चव्हाण -सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार- कृषी

दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा

अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!