
महाराष्ट्र
अनलॉकबाबत आज संध्याकाळपर्यंत नोटीफिकेशन निघेल:वडेट्टीवार
महाराष्ट्रातील 18 जिल्हे 4 जूनपासून अनलॉक होणार अशी घोषणा करून नंतर तोंडावर पडलेले राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा अनलॉक बाबत मोठे भाष्य केले आहे
नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले ‘लॉकडाऊनमधून बाहेर नेमकं कसं पडता येईल याबाबत महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं काही गाइडलाइन्स तयार केल्या आहेत. त्याबाबतचा मसुदा मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवला आहे. त्याला एकदा मान्यता मिळाली की जिल्हावार परिस्थितीचा आढावा घेऊन ही मार्गदर्शक तत्त्वे लागू होतील. आज संध्याकाळपर्यंत बहुधा याबाबतचे नोटिफिकेशन निघेल हे मोठे विधान वडेट्टीवार यांनी केले आहे