
आगामी सर्व निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार: नाना पटोले
राज्यात 3 पक्षाचे महाविकास आघाड़ी सरकार स्थापन झाले आणि हे सरकार जास्त काळ टिकणार नाही अशी भाकिते वर्विण्यात आली होती परंतु या सरकारने यशविरीत्या एक वर्ष पूर्ण केले ,आता येणाऱ्या निवडणुका तिन्ही पक्ष एकत्र मिळून लढतील अशी चर्चा सुरू असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत मोठे विधान केले आहे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.यावेळी बोलताना काँग्रेस राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढेल असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आघाडी बिघाडी होईल का अशा चर्चांना उधाण आलं आहे.
पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठा वाद सुरू असल्याची माहिती समोर आली होती. मविआ सरकारमधून काँग्रेस बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं.यामुळेच पदोन्नतीतील आरक्षणावर मुख्यमंत्री काय भूमिका घेणार यावर मविआ सरकार टिकून असल्याची चर्चादेखील राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर सरकार टिकतं का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे,या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांचे हे विधान महत्वाचे मानले जात आहे