पश्चिम विदर्भ

पालकमंत्री बच्चु कडू यांचा आज जिल्हा दौरा

अकोला: राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे गुरुवार दि. 3 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

गुरुवार दि. 3 रोजी दुपारी 12 वा. कोविड केअर सेंटर शिवाजी महाविद्यालय, अकोला येथे उद्घाटन प्रसंगी उपस्थिती. दुपारी 12 वा. 30 मि. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, दुपारी 1 वा. 35 मि. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे जिल्ह्यातील निर्माणधीन विविध रस्त्यांबाबत आढावा सभा. दुपारी 2 वा.35 मि. नी कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत आढावा बैठक, दुपारी 3 वा. 5 मि. नी विविध विभागात बाह्य स्त्रोत/कंत्राटी पद्धतीने नियुक्त कर्मचारी व कामगार याबाबत सविस्तर आढावा. दुपारी 3 वा. 35मिनीटाने खरीप हंगाम बि-बियाणे व खते उपलब्धता व नियोजन आढावा. दुपारी 4 वा. 5 मि. शासकीय विश्रामगृह अकोला येथे आगमन व राखीव. सवडीने कुरळपुर्णा मार्गे जि. अमरावती कडे प्रयाण.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!