
वर्धेत पुढील 4 दिवस मेघगर्जनेसह वारा आणि जोरदार पावसाची चेतावणी
वर्धा : वर्धा जिल्ह्यात 3 ते 6 जून पुढील 4 दिवस मेगगर्जनेसह सुसाट वारा आणि जोरदार पावसाची चेतावणी हवामान खात्याने वर्तविली आहे.याआधीही हवामान खात्याने वर्तविलेली अंदाज खरे ठरले होते
हवामान खात्याने दिलेल्या माहितीप्रमाणे 3 जूनला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून एक दोन ठिकाणी विजेच्या कडकडाटासह 30 ते 40 किमी प्रतीतास वारा वाहण्याची शक्यता आहे
4 जूनला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून एक दोन ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे
5 जूनला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून एक दोन ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे
6 जूनला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून एक दोन ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे
या चार दिवसांत नागरिकांनी हवामानात बदल होण्याची शक्यता लक्षात घेवूनच कार्य करावे