पश्चिम विदर्भ

यवतमाळात लागोपाठ दुसऱ्या दिवशी सैराटची पुनरावृत्ती,युवकाची हत्या

यवतमाळ दि 2 जून : यवतमाळ जिल्ह्यात लागोपाठ दुसऱ्या दिवशी सैराटची पुनरावृत्ती झाली यात एका युवकाची हत्या करण्यात आली आहे. लागोपाठ झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनेने यवतमाळ जिल्हा हादरला आहे

आज घडलेल्या घटनेत अंतरगाव येथे प्रेमसंबंधातून युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आरोपी पवन विजय राठोड (२१) व त्याचे वडील विजय परसराम राठोड (५०) दोघेही रा. अंतरगाव यांनी  समीर शेख याची हत्या केल्याची तक्रार मृताचा भाऊ आमिन शेख छोटू (२२) रा. अंतरगाव याने आर्णी पोलीस ठाण्यात दिली.

आरोपी पवन राठोड याच्या बहिणीसोबत समीर शेख छोटू याचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून समीरवर आरोपींनी प्राणघातक हल्ला केला. आरोपींच्या हल्ल्यात समीरच्या छाती आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला तत्काळ आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच आर्णी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींविरूध्द भादंवि कलम ३०२,३४ गुन्हा दाखल करण्यात आला. आर्णी तालुक्यात लागोपाठ दोन ‘ऑनर किलिंग’च्या घटना घडल्याने चिंतेचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!