
यवतमाळात सैराटची पुनरावृत्ती,मुलगी आणि जावई गंभीर
यवतमाळ दि 1 जून : यवतमाळ जिल्ह्यात सैराटची पुनरावृत्ती झाली असून प्रेमविवाह केल्याने नाराज बापाने पोटच्या मुलीवर आणि जावयावर चाकूहल्ला केला,यात मुलगी आणि जावई गंभीर जखमी झाले आहे
सविस्तर असे की यवतमाळ जिल्ह्यातील चिकणी (कसबा) येथील सागरचे गावातील शुभांगीवर प्रेम जडले. त्यानंतर दोघांनी २०१६ मध्ये सहमतीने आंतरजातीय विवाह केला. त्यांच्या लग्नाला आता पाच वर्ष झाली. दोघांचा संसार सुरळीत सुरू असताना शुभांगीचे वडील दादाराव माटाळकर यांचा या प्रेमविवाहाला सुरुवातीपासूनच विरोध होता. मुलीने गावातील तरूणासोबतच प्रेमविवाह केल्याने त्यांनी चिकणी गाव सोडले आणि कुटुंबासह आर्णी येथे स्थायिक झाले होते.
या गोष्टीचा राग त्यांचा मनात असतानाच याचा विस्फोट होवून रविवारी सायंकाळी ६.३० वाजता दादाराव माटाळकर याने शुभांगी व सागर यांना ठार मारण्याच्या उद्देशाने गावी चिकणी (कसबा) येथे जाऊन चाकुने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. याप्रकरणी सागरचे काका नारायण नानाजी अंभोरे यांनी दादाराव माटाळकर याच्याविरोधात आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी दादारावविरूद्ध भादंवि ३०७, ४५० तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करीत आहे.