पश्चिम विदर्भ

शिवसेना आमदाराच बाहुबली अवतार,शर्ट काढून रस्त्यावरच झाड केलं बाजुला

देवेंद्र फडणवीस याच्या तोंडात कोरोणाचे विषाणू कोंबेन असे विधान करून चर्चेत आलेले बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड पुन्हा चर्चेत आले आहेे

बुलढाण्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे ठीकठिकाणी झाडे उन्मळून पडली,अश्याच एका ठिकाणी झाड रस्त्यावर पडले असताना आमदार संजय गायकवाड यांचा ताफा अडकला, ठेठ संजय गायकवाड गाडीतून उतरले आणि शर्ट काढून झाडाला इतरांच्या मदतीने बाजुला केले,त्यांचा हा अवतार तुफान चर्चेत आला आहे

बुलढाण्यात शनिवारी सायंकाळपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामध्ये अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाली तर अनेक घरांचे नुकसान झाले. हवेचा वेग जास्त असल्यानं अनेक झाडं उन्मळून रस्त्यावर पडली आहेत. शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मतदारसंघात झालेल्या या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार संजय गायकवाड निघाले होते.

मतदारसंघात पाहणी करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांचा ताफा रायरा डाबा या गावाजवळ आला. इथं रस्त्यावर झाड पडलेलं होतं, त्यामुळं रस्ता अडला होता. मग काय आमदारांनी इतर कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना संपर्क करून वेळ न गमावता स्वतः शर्ट काढला आणि सहकाऱ्यांच्या मदतीनं झाड बाजुला केलं.

काही महिन्यांपूर्वी राजूर घाटामध्ये भला मोठा दगड रस्त्यावर पडल्यानं अनेक वाहनांना अडथळा निर्माण होत होता. तो दगडही आमदारांनी स्वतः बाजूला केला होता, आणि आज हे झाड बाजूला केल्याने आमदार संजय गायकवाड यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!