महाराष्ट्र

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा, तिन्ही इमारतीमध्ये सर्च ऑपरेशन सुरू ,नागपुरातील तरुणाचा खोडसाळपणा

मंत्रालयातील तिन्ही इमारतींमध्ये सध्या सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे समजते. डॉग स्क्वाड सध्या बॉम्बचा शोध घेत आहे

मुंबई: राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालायत रविवारी बॉम्ब ठेवल्याच्या दूरध्वनीने मोठी खळबळ उडाली. एका अज्ञात व्यक्तीने मंत्रालयात दूरध्वनी करुन बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. यानंतर सुरक्षायंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या असून वेगाने कामाला लागल्या होत्या. मात्र, काहीवेळानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. नागपूरमधील सागर मंदेरे या तरुणाने हा दूरध्वनी केला होता. हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रालयाच्या कंट्रोल रुममध्ये दुपारी पाऊणच्या सुमारास हा फोन आला होता. त्यानंतर बॉम्बशोधक पथक मंत्रालयात दाखल झाले आणि शोधमोहीम सुरु झाली .

मंत्रालयातील तिन्ही इमारतींमध्ये सध्या सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे समजते. डॉग स्क्वाड सध्या बॉम्बचा शोध घेत आहे. मात्र, सारा परिसर पिंजून काढल्यानंतरही कोणतीही स्फोटके सापडली नाहीत. दरम्यान, या निनावी दूरध्वनीनंतर मंत्रालयाच्या परिसरातील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अन्य यंत्रणांचे प्रमुख अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. सध्या कोरोनामुळे मोजकेच कर्मचारी मंत्रालयात उपस्थित असतात. त्यामध्ये आज रविवारी असल्याने मंत्रालयात लोकांची अगदी कमी वर्दळ आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!