
अर्ध्या वर्धेला पुढील 3 दिवस पाणीपुरवठा नाही,जाणून घ्या कोणत्या भागात येणार नाही पाणी
धाम नदीच्या पात्रेचे स्वच्छता अभियान राबवण्याचे कार्य सुरू करण्यात आलेआहे,वर्धा पाटबंधारे विभाग,वर्धा नगरपालिका प्रशासन,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येत आहे
या अभियानाचा मुख्य उद्देश धाम नदीची पाणी साठवण क्षमता वाढविणे आहे
या सफाई अभियानामुळे अर्ध्या वर्धेला 3 दिवस पाणीपुरवठा होणार नाही त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आव्हान प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे
या भागात होणार नाही पाणीपुरवठा
कृष्णानगर,बॅचलर रोड, गौरक्षण वार्ड,साईमंदिर रोड,पोद्दार बगीचा, धंतोली, भामटीपुरा,तेलीपुरा,इंदिरा मार्केट,वंजारी चौक,राजकला टाकीज रोड,सराफ लाइन,रामनगर,निर्मल बेकरी,पटेल चौक,अंबिका चौक,गुजराती भवन,पावड़े चौक,राधानगर, मानस मंदिर,गजानननगर, तारफैल एम.जी.कॉलोनी गोंडप्लॉट,स्टेशनफैल,दयालनगर,अशोकनगर,जाकिर हुसैन कॉलोनी