
पूर्व विदर्भ
गोंदिया जिल्ह्यातील पोलिसांच्या मारहाणीत एका आरोपीचा मृत्यू: चित्रा वाघ
गोंदिया जिल्ह्यातील पोलिसांच्या मारहाणीत एका आरोपीचा मृत्यू झाल्याची माहिती भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे.
जालना मारहाण प्रकरणानंतर गोंदिया पोलिसांचा एक प्रताप समोर, असं वाघ यांनी म्हटलं आहे. ‘आमगाव तालुक्यात आरोपी राजकुमार याचा पोलिसांनी लाकडी दांडा असलेल्या पट्ट्याने मारहाण करत जीव घेतला,’ असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. पोलिसनिरीक्षक व इतरांवर सीआयडीने गुन्हा दाखल केलाय, असंही वाघ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आमगाव येथील मारहाण प्रकरणातील आरोपी राजकुमार अभयकुमार याचा २२ मे रोजी मृत्यू झाला असून या प्रकरणी पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण आणि ४ पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध तपास झाल्यानंतर ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.