महाराष्ट्र

मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोनापासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी दिले हे निर्देश

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महिला व बाल विकास विभागासोबत झालेल्या बैठकीत कोरोनापासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी पुढील निर्देश दिले.

– टास्कफोर्समधील बालरोगतज्ज्ञ आणि महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांत संवाद घडवून आणावा.

– या संवादात बालकांना कोरोनापासून कशाप्रकारे सुरक्षित करता येईल याचे मार्गदर्शन करावे.

– विभागाचा बालकांसंदर्भातील अनुभव आणि माहितीची देवाणघेवाण करावी.

– यासंदर्भातील उपाययोजनांचा मार्गदर्शक सूचनांमधे समावेश करावा.

– कोरोनामुळे दोन्ही किंवा एका पालकाचा मृत्यू झालेल्या बालकांबाबत विभागाने धोरण निश्चित करावे.

– अशा बालकांना संगोपनापासून शिक्षणापर्यंतचे लाभ कसे देता येतील याची माहिती द्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!