
महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये 15 दिवस वाढ,नवीन नियमावली 1 जूनला जाहीर होणार – राजेश टोपे
महाराष्ट्रात सुरू असलेले लॉकडाऊन पंधरा दिवसांपर्यंत वाढवण्यात आलं आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आज पुण्यात झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, “लॉकडाऊन 15 दिवस वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण या संदर्भातली नियमावली 1 जून रोजी जारी केली जातील.”
ते पुढे म्हणाले, “जिथं रुग्ण जास्त आणि बेड कमी उपलब्ध आहेत तिथे लॉकडाऊन जास्त प्रमाणात शिथिल केलं जाणार नाही. पण जिथं कमी रुग्ण आहेत, त्या ठिकाणांसंदर्भात 1 जून रोजी गाई़डलाईन जारी केल्या जातील.”
पुण्यातला वीकेंड लॉकडाऊन काढून टाकण्यात आला आहे. शनिवार, रविवार सकाळी 7 ते 11 अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहणार, असंही ते म्हणाले.
राज्याचा लॉकडाऊन तसाच राहील मात्र ज्या जिल्हयात रुग्णसंख्या कमी झाली आहे त्या जिल्ह्यांना लॉकडाउन मध्ये काही प्रमाणात शिथीलता देण्यात येईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं