पश्चिम विदर्भ

पांगरी पॅटर्न वापरून वाशिम जिल्हा टँकर मुक्त करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

आभासी सभेद्वारे साधला पांगरी वासियांशी संवाद

नागपूर/वाशिम (दीपक भारुका) : वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील पांगरी महादेव या गावात ज्याप्रमाणे सूक्ष्म पाणलोटाचे काम सुरू आहे, त्याप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र असे काम करून जिल्हा टँकरमुक्त करा. असे आवाहन केंद्रीय रस्ते विकास व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी

दुर्गम व उपेक्षित पांगरी ( महादेव ) या लोकवस्ती मधील लोकसहभागाने निर्माण झालेल्या भव्य तलावाचे गुरुवारी दि. २७ मे रोजी पांगरीवासीयां सोबत झालेल्या आभासी सभेत लोकार्पण करताना केले. यावेळी श्रमदानातून केल्या जाणाऱ्या पांधन रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. केंद्रीय मंत्री विकास पुरुष ना. नितीन गडकरी यांच्या प्रेरणेतून व पूर्ती सिंचन विकास संस्था मार्गदर्शनात वाशीम जिल्ह्यातील “जलहक्क” कार्यकर्ते सचिन कुळकर्णी उपेक्षित व मागासलेले गावे दत्तक घेऊन कार्यरत असतात. गेल्या सात महिन्यापासून अत्यंत दुर्लक्षित वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात पांगरी (महादेव) या लोकवस्ती मध्ये कार्यरत आहे.

जलविभाजक रेषा (divide line or water shade) असलेल्या भू-क्षेत्रातील लोकसंख्या तब्बल ८०० पेक्षा अधिक असून २१ वर्षांपासून या पांगरी ( महादेव ) लोकवस्तीला “गाव” म्हणून शासन दप्तरी ग्रामपंचायत नाही ना गट ग्रामपंचायत नाही. यामुळे विकासा पासून दुर्लक्षित आहे. एवढ्या मोठ्या लोकवस्तीला ग्रामपंचायत दर्जा नसल्यामुळे कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. लोकवस्तीत सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा असून एक कि.मी. अंतरावरून एका खाजगी विहिरीतून पाणी आणावे लागते. गावात अति कॅल्शियमयुक्त पाणी असल्यामुळे सहा रुग्णाचे मूत्रपिंड निकामी होऊन मृत्यू पावले तर सात रुग्ण मूत्रपिंडाच्या आजाराने डायलिसिस वर आहे. हि समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टीकोणातून सचिन कुळकर्णी यांनी या भटक्या विमुक्त समुदाय असलेल्या वनग्राम पांगरी मध्ये कार्यरत होऊन पुढाकार घेतला.

“लोकवस्तीमध्ये स्वहक्काचे मुबलक पाणी असल्यास विकासाला गती प्राप्त होते”, हा सिद्धांत गावकऱ्यात पटवून सूक्ष्म उपपाणलोट राबविण्याचा संकल्प केला. पहिली पायरी म्हणून लोकसहभागातून १०० बाय १०० बाय ३ मीटरचा भव्य गावतलाव पडीक जमिनीवर निर्माण केला. तसेच गावातून वाहणाऱ्या नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरणचे दिड कि.मी. चे काम पूर्ण झाले असून शिल्लक तीन कि.मी. नाल्याचे व अंदाजे ४ कि.मी. छोट्या उपनाल्याचे काम साधना अभावी शिल्लक आहे. नुकत्याच अचानक काही मिनिटे झालेल्या अवकाळी पावसामुळे, खोलीकरण – रुंदीकरण झालेल्या नाल्यात तुडुंब पाणी भरल्याने गावकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. यामुळे गाव परिसराची व शेत शिवाराची भूजल पातळी चांगल्या प्रमाणे वाढवून गाव हक्काच्या तलावात तुडुंब पाणी भरलेले राहील. ज्याचा परिणाम शेत शिवारावर होऊन शेती पिकाला चांगली मदत प्राप्त होईल. तसेच या परिसरातील विविध प्रजातीचे बांबू वन निर्माण करणे, स्वयंरोजगार निर्माण करण्याचा मानस आहे. केंद्रीय मंत्री ना. नितिन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त नवनिर्माण केलेल्या भव्य तलावाचे लोकार्पण, श्रमदानातून होणाऱ्या पांधन रस्त्यांचे भूमिपूजन, ना. गडकरी यांच्या शुभहस्ते केल्या गेले. त्यांच्या कार्याला पांगरी गावाकऱ्यांच्या सहभागातून दत्ताजी जामदार, माधव कोटस्थाने, व्ही. डी. पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी भरीव सहकार्य केले आहे. आभासी सभेद्वारे जेव्हा केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला तेव्हा गावकऱ्यांचा आनंद पारावर उरला नव्हता. वाढदिवसाच्या दिवशी दुर्गम भागांमध्ये भटक्या विमुक्त बांधवांशी चर्चा करून उपाययोजना करण्याची धडपड सर्वत्र चर्चेत आहे.

______________________________________

वाशिम जिल्हा “आकांक्षीत जिल्हा” असल्याचे भूषणावह नाही. आपल्याला मागासलेपणाचा डाग पुसायचा आहे. यासाठी जलसंधारण कार्यातून कार्यरत रहावे म्हणून नितीन गडकरी सतत प्रेरणा देऊन वेळोवेळी संपर्क करून बारकाईने सर्व परिस्थितीची जाणून घेत असतात. अशी प्रतिक्रिया पांगरी ग्रामसभा समन्वयक सचिन कुलकर्णी यांनी दिली.

______________________________________

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!