महाराष्ट्र

हॅलो मी राज ठाकरे बोलतोय,90 वर्षीय शिक्षिकेच्या मदतीला धावले राज ठाकरे

चक्रीवादळाने वृद्धाश्रमाचं मोठं नुकसान झालं होतं ,नुकसान झाल्याने मदतीची याचना करणाऱ्या शिक्षिकेच्या आर्त हाकेची तातडीने दखल घेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना फोन करून आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यात येईल अशी हमी दिली

उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील या तिन्ही बड्या नेत्यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे (Suman Randive) या 90 वर्षांच्या आहेत. सुमन सध्या वृद्धाश्रमात आहेत. मात्र वसईतील या वृद्धाश्रमाला तोत्के वादळाचा फटका बसला. आता या वृद्धाश्रमाला मदत मिळावी, अशी मागणी या शिक्षिकेने आपले विद्यार्थी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयंत पाटील यांच्याकडे केली आहे

काय म्हणाल्या होत्या शिक्षिका

या चक्रीवादळामुळे आमच्या वृद्धाश्रमाचं खूप नुकसान झालं. छप्पर उडालं. सगळ्या वृद्धांना रात्री झोपायला त्रास होतो. मच्छर चावतात. उद्धव बेटा मला तुला भेटायचं आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असातना मी तुला शिकवले होते. इथली परिस्थिती खूप खराब आहे. कृपया आम्हाला मदत कर”, असं शिक्षिका सुमन म्हणाल्या.

सुमन लक्ष्मीकांत रणदिवे या दादर इथल्या बालमोहन विद्यामंदिर या शाळेत शिक्षिका होत्या. तिथे त्या गणित आणि विज्ञान हे विषय शिकवत होत्या. त्या 1991 मध्ये निवृत्त झाल्या.

सुमन रणदिवे या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, जयंत पाटील यांच्या माजी शिक्षिका आहेत. 1991 मध्ये त्या निवृत्त झाल्या. मात्र पतीचं निधन आणि काही काळाने झालेला मुलाचा मृत्यू, यामुळे सुमन रणदिवे या वसईतील सत्पाळा गावातील “न्यू लाईफ फाऊंडेशन” या वृद्धाश्रमात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!