
महाराष्ट्रात लवकरच धावणार एसटी बस,हालचाली सुरू
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे आगमन होताच कडक निर्बंध लावत सरकारने एसटी बस बंद केल्या होत्या पण आता महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचे संकेत मिळताच लवकरच एसटी बस धावू शकते त्या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्या आहे
राज्याची जीवनवाहिनी असलेली एसटी सुरू करण्यासाठी राज्यातील अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, मुंबई आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी नसल्याने तूर्तास मुंबईकरांच्या एसटी प्रवासावर अंकुश कायम राहणार आहे.
आता करोना स्थिती नियंत्रणात आल्याने बस सेवा सुरू करण्यात याव्यात, असे पत्र हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी महामंडळाच्या परभणी विभागाला पाठवले आहे. याचप्रमाणे अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी आपआपल्या जिल्ह्यांतर्गत गाव-तालुक्यातील एसटीसेवा पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी स्थानिक एसटी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
या हालचालीमुळे महाराष्ट्रात लवकरच एसटी बस धावण्याचे संकेत मिळत आहे, एसटी सुरू झाली तर शहरासोबत ग्रामीण भागाच्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे