नागपूर

फडणवीसांची नागपूरात म्युकरमायकोसिसची स्थितीबाबत आयुक्त आणि महापौरांसोबत बैठक

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त,महापौर ,अधिकारी,आणि अन्य लोकप्रतिनिधींसोबत एक बैठक आज दुपारी नागपूर महापालिकेत घेतली. म्युकरमायकोसिस रूग्णांची स्थिती, त्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि संभाव्य तिसरी लाट विचारात घेता हाती घ्यावयाच्या उपाययोजना इत्यादींबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली

या बैठकीत म्युकरमायकोसिसच्या रूग्णांचे स्क्रिनिंग लवकर व्हावे, म्हणजे वेळेत उपचार करून त्या रूग्णाला लवकर दिलासा मिळेल. कॉल सेंटरची स्थापना करून स्क्रिनिंगची आणि वेळेत उपचारांची योग्य स्ट्रॅटजी तयार करण्यात यावी, हे निर्णय घेण्यात आले. पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देत यासाठी ऑपरेशन थिएटर्सची संख्या वाढविण्याचा निर्णय सुद्धा यावेळी घेण्यात आला.

संभाव्य तिसर्‍या लाटेची शक्यता विचारात घेता काय उपाययोजना केल्या आहेत आणि आणखी काय करता येईल, याबाबत सुद्धा सविस्तर चर्चा यावेळी झाली. पूर्वतयारीचा एक भाग म्हणून महापालिकेच्या वतीने लहान मुलांसाठी 200 खाटांचे एक रूग्णालय तातडीने उभारण्यात यावे, अशी सूचना यावेळी फडणवीसांनी केली आणि यासाठी लागणारी सर्व ती मदत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटच्या वतीने करण्यात येईल, असेही यावेळी फडणवीसांनी सांगितले.

 

#NagpurFightsCorona

#MaharashtraFightsCorona

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!