Breaking News

महाराष्ट्रात 18 जिल्हयात होम आयसोलेशन बंद ,पहा तुमचा जिल्हा आहे का याच्यात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील कोरोना परिस्थिती लसीकरण, म्युकरमायकोसिस याचा आढावा घेतला. मंत्रालयात बैठकीवेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे तसेच दोन्ही विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्याबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी होम आयसोलेशन बाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला व 18 जिल्हयात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला

राज्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद

राज्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर तर पॉझिटिव्हीटी रेट 12 टक्क्यांवर आला आहे. होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. कोविडचे सेंटर वाढवून तिथे आयसोलेशन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

राज्यातील १८ जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय

– या 18 जिल्ह्यात  बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशीम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद, रायगड, पुणे, नागपूर या जिल्ह्यांचा समावेश

– लक्षणे नसलेले कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहता येणार नाही

– या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवलं जाणार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!