महाराष्ट्र

मनसेच्या दणक्यानंतर आदित्य नारायणनं मागितली अलिबागकरांची माफी

मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर आदित्य नारायण यानं अलिबागकरांची माफी मागितलीय. सोनी टीव्हीचा ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) या कार्यक्रमात शोचा होस्ट गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) यानं एका स्पर्धकाशी बोलताना ‘राग पट्टी ठीकसे दिया करो, हम अलिबागसे आये है क्या’ असे म्हटले होते.

मनसेच्या अमेय खोपकर यांनी देखील आदित्य नारायण याच्या या वक्तव्यावर त्याची चांगलीच कानउघडणी केली होती. अखेर नमतं घेत आदित्य नारायण यांनी अलिबागकरांची माफी मागितलीय. (Aditya Narayan Apologized To Alibagkar After MNS Ameya Khopkar

मी मनापासून हात जोडून माझे आवडते अलिबाग आणि अलिबागच्या बंधूभगिनींची माफी मागतो. नकळत का होईना मी त्यांचं मन दुखावल्याचं मला समजलंय. असं करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. माझं आपल्याला निवेदन आहे की, भावाकडून अनवधानानं झालेली चूक समजून क्षमा करावी, धन्यवाद,” असा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी माफीनामा दिलाय.

मनसेच्या अमेय खोपकरानी आदित्यला दिलं होत अल्टीमेटम

आदित्य नारायण याच्या या वक्तव्याचा निषेध नक्कीच व्हायला पाहिजे. हिंदी वाहिनीवर असं सरळ म्हटलं जात. यांना अलिबागची संस्कृती माहीत नाही, यांना अलिबागची लोकं माहिती नाही. आमचं, या अलिबागकरांचं डोकं फिरलं तर हिंदीतली एक ही गोष्ट अलिबागमध्ये जाऊ देणार नाही.’

हा अलिबागकरांचा अपमान आहे. याचा आम्ही निषेध करतो. आताच माझं उदित नारायण यांच्याशी बोलणं झालं, मी त्यांना माझ्या भाषेत समजावले आहे. त्यांना हे देखील सांगितले की, हल्ली त्याच्या मुलाच्या आदित्यच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्याचा आगाऊपणा आणि उद्धटपणा वाढल्याच्या आणखी तक्रारी येत आहेत. अलिबागचा हा अपमान आम्ही सहन करणार नाही! मी वाहिनीशी देखील संपर्क साधला आहे, त्यांना सांगितले आहे की, पुढच्या भागात त्यांना अलिबागकरांची जाहीर माफी मागावी लागेल.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!