पश्चिम विदर्भ

वाशिम जिल्ह्यात शेती संबंधित अभियांत्रिकी कामाची दुकाने सुरु ठेवण्यास मुभा

#वाशिम दि. २४ : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात २७ मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये अंशतः बदल करून जिल्ह्यातील शेती संबंधित अभियांत्रिकी कामाची दुकाने, ट्रॅक्टर स्पेअरपार्ट, ट्रॅक्टरचे टायर, लोहार व सुतारांची दुकाने सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, २४ मे रोजी निर्गमित केले आहेत.

संबंधितांनी कोविड-१९ बाबतच्या सर्व मार्गदर्शक तत्वांची काटेकोर अंमलबजावणी करावी. कोविड मार्गदर्शक तत्वांचा भंग झाल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय दंड संहिता अन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!