
1 जून नंतर काही जिल्हात लॉकडाउनमध्ये शिथिलतेचे आरोग्यमंत्री टोपे यांचे संकेत
महाराष्ट्रात लॉकडाउनची मुदत संपायला 8 दिवस बाकी असताना 1 जून नंतर लॉकडाउन राहणार की नाही याबाबत महत्वाची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली
येत्या काही दिवसांमध्ये लॉकडाऊनसंदर्भातील महत्त्वाचा निर्णय़ प्रशासन घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली
राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येच घट दिसून येत आहे आणि जिथं रुग्ण दगावण्याचं प्रमाण कमी अथवा आकडा नियंत्रणात आहे, अशा जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल केला जाऊ शकतो असे स्पष्ट संकेत राजेश टोपे यांनी दिले आहेत. परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती नाही, तिथे मात्र निर्बंध कायम राहणार असून, काही ठिकाणी आणखी कठोर पावलंही उचलली जाऊ शकतात.
जिल्ह्यांमध्ये नवे रुग्ण सापडण्याचा वेग आणि त्या तुलनेत होणारे मृत्यू असे सर्व निकष अंदाजात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच लॉकडाऊनसंदर्भातील पुढील निर्णय़ घेतला जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.