पश्चिम विदर्भ

जीना तेरे संग, मरना तेरे संग,अल्पवयीन प्रेमीयुगलाची आत्महत्या

अमरावती दि 21 मे : प्रेमात जीना तेरे संग, मरणा तेरे संग असा आणाभाका प्रेमी युगल घेत असतात, असाच एक प्रकार अमरावतीमध्ये समोर आला आहे. इथे अल्पवयीन प्रेमी युगुलाची एकाच झाडाच्या फांदीला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीसांचा पुढील तपास सुरू आहे.

महादेवखोरी परिसरातील जंगलात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये १६ वर्षीय मुलगी तर १७ वर्षीय मुलाचा समावेश आहे. मुलगी ही फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतून तर मुलगा राजापेठ ठाणे हद्दीतून मिसिंग झाल्याची तक्रार मृताच्या नातेवाईकांनी १४ मे रोजी नोंदविली होतीी

प्रेमीयुगुलांनी गळफास चार ते पाच दिवसांपूर्वी घेतला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून, सदर आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत एकाच झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी घटनास्थळावरून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून यामध्ये कुटुंबाचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!