महाराष्ट्र

मी हेलिकॉप्टरमधून फोटोसेशनसाठी नाही तर जमिनीवरून मदतीसाठी आलो आहे:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

तौत्के चक्रीवादळामुळे (Tauktae Cyclone) महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे,यातहीरा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वादळाचा या जिल्ह्यांना वादळाचा चांगलाच फटका बसला आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

मुंबईहून रत्नागिरी (CM Uddhav Thackeray in Ratnagiri) येथे पोहोचताच मुख्यमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी करत जिल्हा प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेतला आहे. यानंतर त्यांनी वादळामुळे नुकसान (Tauktae Cyclone affected district) झालेल्या शेती आणि फळबागांचं पंचनामे दोन दिवसांत तातडीने करावेत असे सांगितले आहे.

या दौऱ्यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. ठाकरे म्हणाले, की कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी मी आलो आहे. मी इथे केवळ फोटोसेशनसाठी आलो नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीनंतर बोलताना म्हणाले की प्रत्यक्ष पंचनामे झाले की नुकसानीचा अंदाज घेऊन मदतीबाबत निर्णय घेणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!