पूर्व विदर्भ

गडचिरोलीत 13 नक्षलवादी ठार,पोलिसांची मोठी कारवाई

आज गडचिरोलीत पुन्हा एकदा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 युनिट आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यापैकी, 8 जणांचे मृतदेह पोलिसांनी जंगलातून ताब्यात घेतले आहे

काही नक्षलवादी जखमीही झाले आहेत. एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील पैदी जंगल परिसरात ही चकमक उडाली. पोलिसांचे सी-60 पथक नक्षलविरोधी अभियान राबवत असताना ही चकमक उडाली. जंगल परिसरात पोलिसांचे सर्च मोहीम सुरू असून बाकी नक्षलवाद्यांचे मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू असल्याची माहिती समोर येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!